Call +91-9604221133

Buy your Grocery easily online in Kolhapur

EzyGrocery Blog

Just another WordPress site

 • First Time in Kolhapur

  EzyGrocery in Kolhapur EzyGrocery in Kolhapur

  EzyGrocery.in Press Note - 25-01-2016

   

  कोल्हापूर मधील लोकांची घरगुती सामान आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी होणारी दगदग थांबवण्यासाठी कोल्हापूर मध्ये प्रथमच online shopping करून मोफत घरपोच सुविधा पुरवण्यासाठी EzyGrocery.in हि वेबसाईट सुरु झाली आहे . आज पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहराप्रमाणेच कोल्हापूर मधेही लोकांना नोकरीधंद्यातून वेळ काडणे अवगड होता आहे. घरात लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी साठी आठवड्यातून ३-४ तास घालवणे आणि ते जड ओझा घेऊन रहदारीतून  घरी येणे फार त्रासदायक ठरत. अशा वेळी फक्त काही क्लिकवर आपण सर्व काही घरपोच मिळवू शकता फक्त काही तासात EzyGrocery.in हि अशी सर्विस देणारी कोल्हापूरमधील पहिली आणि एकमेव वेबसाईट आहे . EzyGrocery.in मोबाईल एप वरून सुद्धा वापरू शकता . सध्या कोल्हापूर मध्ये किराणा सामान , धान्य , डाळी, बेकरी, शीतपेये , तयार खाण्याचे पदार्थ , आंघोळीचे आणि घर साफ सफायीचे सामान असे जवळपास १००० पेक्षा जास्त वस्तू सध्या पुरवल्या जातात . येत्या काही महिन्या मध्ये ५००० पेक्षा जास्त वस्तू पुरवल्या जातील . लवकरच ताज्या भाज्या आणि फळे सुद्धा उपलब्ध करून दिले जातील . घरात लागणाऱ्या वस्तू या कुटुंबाकरता असल्याने EzyGrocery , प्रत्येक टप्प्यावर सर्व वस्तूंच्या दर्ज्याची काळजी घेते .

  लोकांनी आठवडाभर काम करून थकल्यानंतर शनिवार रविवार खरेदीमध्ये घालवण्या ऐवजी आपल्या कुटुंबीय आणि मित्रपारीवारासोबत घालवावेत आणि घरात लागणाऱ्या  सर्व वस्तू  खात्रीशीर पणे उत्तम दर्ज्याच्या व बाजारभाव पेक्षा कमी किमती मध्ये उपलब्ध करण्यासाठी EzyGrocery या व्यवसायाची सुरवात झाली. गेल्या दोन महिन्या मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु केल्यानंतर १०० हून जास्त लोकांनी या सर्विस चा पुन्हा पुन्हा लाभ घेतला , त्यांच्या कडून आलेल्या सल्ल्यानुसार EzyGrocery ने भरपूर सुधारणा केल्या आणि आता लोकांच्या  सोयीसाठी सर्वोत्तम सेवा देण्यासाठी २६ जानेवारी पासून सुरवात करत आहे. ऑर्डर केल्यानंतर काही तासात मोफत घरपोच सुविधा दिली जाते . पुढच्या आठवड्यापासून वेबसाईट वर क्रेडीट कार्डाने किंवा बँक ट्रान्स्फर करून खरेदी करण्याची सोय सुद्धा उपलब्ध केली जाणार आहे. EzyGrocery सर्व वस्तू बाजारभावापेक्षा फार कमी किमती मध्ये लोकासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे .    

  ग्राहकाला घरपोच सेवा हवी आहे.  कर्मचारी, नोकरदार महिला, ज्येष्ठ नागरिक इंटरनेटद्वारे ऑनलाइन ऑर्डर नोंदवितात. सुरवातीला केवळ इलेक्‍ट्रिकल किंवा इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूं ऑनलाइन द्वारे खरेदी केल्या जात होत्या आता तांदूळ, गहू, खाद्यतेल यांसारख्या दैनंदिन वापराच्या किराणा मालसुद्धा फक्त काही क्लिक वर मागवला जाऊ शकतो.  या मालाच्या ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढत आहे.  EzyGrocery चे ऍप सुद्धा आहे, ते मोबाईलमध्ये "डाउनलोड‘ करून ऑर्डर नोंदवू शकतात आणि २४ तासात घरपोच समान पुरवल जात . EzyGrocery हा कोल्हापूरमधील अमित चौगुले , अमोल चौगुले , विशाखा देसाई आणि सागर वडे अशा युवा उद्योजकांनी सुरु केलेला नवीन व्यवसाय आहे , त्याला सर्व लोकांनी सहकार्य करावे आणि या सेवेचा लाभ घ्यावा व प्रोत्साहन द्यावे हि आग्रहाची विनंती.

   

  २६ जानेवारी निमित्त EzyGrocery तर्फे ३१ जानेवारी पर्यंत १०००/- पेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना २ किलो साखर मोफत दिली जाणार आहे . तेव्हा सर्वांनी या ऑफर चा फायदा घ्यावा आणि आपली प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोचवावी . ग्राहकांनी केलेल्या विनंतीप्रमाणे EzyGrocery टीम सर्व वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल . आपण मोबाईल वरून किंवा Whatsapp वरून मेसेज करून सुद्धा ऑर्डर देवू शकता. संपर्क -९१४६८३४३३२ / 0231-2322922

1 Item(s)